ठाण्यामध्ये जखमी अवस्थेत आढळले शिपाई बुलबुल आणि नवरंग पक्षी

ठाण्यामध्ये जखमी अवस्थेतील शिपाई बुलबुल आणि नवरंग असे दोन पक्षी आढळले. पक्षीमित्र संजय शिंदे यांनी या दोन्ही पक्ष्यांची उपचार करून सुटका केली. सध्या तीव्र उन्हाळा असून पाण्यासाठी भटकत असताना पक्षी जखमी होतात असं पक्षीमित्र संजय शिंदे यांनी सांगितलं. अनेकदा पाण्यासाठी फिरताना बराच काळ पाणी न मिळाल्यामुळं हे पक्षी भोवळ येऊन पडतात. काहीवेळा लहान पक्ष्यांच्या मागे कावळे लागतात. अनेकदा उंच भिंतींना असे पक्षी धडकूनही जखमी होतात असं शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यामध्ये शिपाई बुलबुल आणि नवरंग पक्षी जखमी अवस्थेत त्यांना आढळले. नवरंग हा पक्षी कावळे मागे लागल्यामुळे घाबरून शिंदे यांच्या मित्राच्या घरात जखमी अवस्थेत पडला. त्यांच्या मित्राने माहिती दिल्यावर शिंदे यांनी त्याची सुटका केली आणि रूग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले. हा नवरंग पक्षी उद्यापर्यंत उडू शकेल असंही संजय शिंदे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading