ठाण्यात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ आणि कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण हा कार्यक्रम काल मोठया उत्साहात संपन्न झाला. मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं या भव्य सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. गणरायाला प्रसन्न करण्यासाठी, विद्या प्राप्तीसाठी, अथर्वशीर्षाचे पठण ही अत्यंत प्रभावी साधना आहे. सामूहिक साधनेचा परिणाम अनेक पटीने मिळतो. एक हजार पेक्षा अधिक महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात 1 माळ रामनाम जपाने झाली.
विख्यात विदुषी धनश्री लेले यांचे अथर्वशीर्षावरील निरूपण ही यावेळी झाले. अथर्वशीर्ष याचा अर्थ जाणून तो आतवर रुजवत मग अथर्वशीर्ष म्हणण्याची अनुभूती जमलेल्या हजारो महिलांनी घेतली.
महिला पौरोहित्य वर्गाने तसेच सर्व ज्येष्ठ शिक्षकांनी पठणात पुढाकार घेतला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading