ठाण्यामध्ये बहुचर्चित ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला आहे. ४० वर्षीय नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झाली असून त्याच्यावर सध्या पार्कींग प्लाझा येथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घाना येथून हा नागरिक ठाण्यात आला होता. त्याची करोना चाचणी करण्यात आली त्यावेळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळं त्याला महापालिकेनं रूग्णालयात दाखल केलं होतं. त्याची ओमायक्रॉनची चाचणीही करण्यात आली. त्याचा अहवाल काल महापालिकेला प्राप्त झाला. यामध्ये त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.