ठाण्यातील गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी रशियातील माऊंट एलब्रूस शिखर सर करून घडवला नवा इतिहास

ठाण्याचे रहिवासी आणि जेष्ठ गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी वयाच्या 59 व्या वर्षी रशियातील सर्वात उंच असलेले माऊंट एलब्रूस शिखर सर करून नवा इतिहास घडवला. या वयात हे शिखर सर करणारे शरद कुलकर्णी हे पाहिले भारतीय आहेत. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अतिशय कठीण हिमवादळाला सामोरे जात त्यांनी शिखरावर यशस्वी चढाई केली. या आधीही 2020 साली साऊथ अमेरिकेतील ‘माऊंट आकांकागुआ ‘ शिखर सर करणारे ते पाहिले वयस्कर भारतीय ठरले होते. 2014 साली एलब्रूस शिखरावरून अतिशय खराब हवामानमुळे मोहीम अर्धवट सोडून त्यांना परतावे लागले होते. पण जिद्धीने परत यावेळी अतिशय खराब वातावरणाला सामोरे जाऊन त्यांनी भारताचा तिरंगा फडकवला. ही मोहीम त्यांची पत्नी अंजली कुलकर्णी यांना त्यांनी समर्पित केली. त्यांचे 2019 साली एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान निधन झाले होते. या आधी शरद कुलकर्णी यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो, ऑस्ट्रेलियातील माऊंट कोझियेस्को, नेपाळ मधील माऊंट एवरेस्ट, मेरा पीक, लोबूचे पीक, भारतातील स्टोककांग्री, माऊंट हनुमान तिब्बा, काश्मीर मधील सनसेट पीक अशी अनेक शिखरे सर केली आहेत. उतार वयात इतर लोक निवृत्तीची भाषा करत असताना या वयात ही शिखरे सर करून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading