ठाणे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. शहाड येथील विद्युत पुरवठा रात्री ३.५० वाजता खंडीत झाल्यामुळे स्टेम प्राधिकरण मार्फत शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरु असुन त्याकरीता साधारणपणे २ ते ३ तास अपेक्षीत आहेत. त्यामुळं पुढील २४ तास ठाणे शहरात पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे.