ठाणे महापालिकेच्या विविध हजेरी पेटीवर रक्षाबंधन साजरं

रक्षाबंधन हा बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण. हा सण आज ठाणे महापालिकेच्या विविध हजेरी पेटीवर साजरा करण्यात आला. महापालिकेच्या हजेरी पेटीवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरूष कर्मचारी, महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. महापालिकेच्या एकूण 50 हजेरी शेड असून या ठिकाणी महापालिकेचे 1900 कर्मचारी असून त्यापैकी 1140 पुरूष आणि 760 महिलांचा समावेश आहे. तर एकूण 2 हजार 36 कंत्राटी कामगार असून त्यापैकी 1 हजार 222 पुरूष आणि 814 महिला काम करीत आहे. आज महापालिकेच्या सर्व हजेरी शेडवर महिला कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading