ठाणे महापालिका क्षेत्रातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम

ठाणे महापालिका क्षेत्रातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. कोविडच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ब्रेक द चेन अंतर्गत टप्पे करण्यात आले आहेत. कोविडच्या स्थितीनुसार दर आठवड्याला स्तराची विभागणी होत असून त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात तिस-या आठवड्यातही तिस-या स्तराचे निर्बंध कायम राहतील असं महापालिका आयुक्तांनी कळवलं आहे. हे आदेश १९ जुलै पर्यंत लागू राहतील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading