ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आजपासून ३० जून पर्यंतची नियमावली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आजपासून ३० जून पर्यंतची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत कार्यक्रमांचे आयोजन, चर्चा करण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारची कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने करण्यासाठी मनाई आहे. प्रार्थनास्थळे, शॉपिंग मॉल्स, सुपर मार्केट, क्रिडांगणे, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा बंद राहतील. सर्व शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण, संशोधन, शिकवणी संस्था बंद राहतील. कंटेन्मेंट झोनमध्ये येण्याजाण्यास आणि वाहतुकीस मनाईक राहील. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तंबाखूचे सेवन, मद्यपान यास मनाई राहील. तर अत्यावश्यक किराणा सामान, दूध, फळे, भाजीपाला, औषधालय, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील. बँकीग, वित्तीय सेवा, टपाल, इंटरनेट सेवा सुरू राहतील. खाद्यपदार्थांची घरपोच सेवा, बेकरी सुरू राहील. ऑप्टीकल स्टोअर्स, औषध निर्माण आणि त्यांचे वितरक आणि वाहतूक, वैद्यकीय उत्पादने आणि सेवा सुरू राहतील तसंच पेट्रोलपंप, एलपीजी गॅस एजन्सीज सुरू राहतील असं पोलीस आयुक्तालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading