ठाणे जिल्हा वकील संघटनेची ५ मार्च रोजी निवडणूक

दर २ वर्षांनी होणारी ठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणुक ५ मार्च रोजी होणार आहे. ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीसाठी अध्यक्षांसह इतर सदस्य पदाकरता २३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुक ५ मार्चला होणार आहे. निवडणुकीत एकूण १३५० वकील मतदार आहे. मतदान शनिवार ५ मार्च रोजी सकाळी ९ते सायंकाळी ५:३०वाजेपर्यंत होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल लागणार आहे. ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अध्यक्ष पदासाठी प्रशांत कदम, मधुकर पाटील, उपाध्यक्ष पदासाठी हेमलता देशमुख, सुधाकर पवार, सुभाषचंद्र सिंह, सचिव पदासाठी नरेंद्र गुप्ते, भाऊ हाडवले, सुनिल लसने, खजिनदार पदासाठी अनिल जोशी, विजय वाजगे, सहसचिव पदासाठी शांताराम देवरे, हेमंत म्हात्रे. जॉइंट सेक्रेटरी महिला पदासाठी स्नेहल कासार, रूपाली म्हात्रे. समिती सदस्य पद सरीता बंद्रे, विकास जोशी, संतोष पांडे, अनिल पवार, गणेश पुजारी, उपेक्षा शेजवाल, रूपाली शिंदे, राजाराम तारमळे,सायली वलामे असे २३ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading