ठाणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वेलफेअर असोसिएशन तर्फे पासवर्ड मनाचा कार्यक्रम

ठाणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट क कर्मचारी वेलफेअर असोसिएशन तर्फे “पासवर्ड मनाचा ” हा कार्यक्रम 18 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ.संजय शेटये हे ‘मानसिक ताण तणावाचे व्यवस्थापन ‘ या विषयावर कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्गाने हजर राहावे असं आवाहन संघटनेचे अध्यक्ष सतीश शिरसाट यांनी केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश अभय मंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सर्व कर्मचारी वर्गावर कामाचा ताण वाढत आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, प्रलंबित प्रकरणांची वाढत असलेली संख्या यामुळे कर्मचारी वर्गावर कामाचा ताण वाढला आहे. कर्मचारी वर्गाला वैयक्तीक, कौटुंबिक तसेच कामाच्या ताणामुळे आलेले मानसिक स्वास्थ्य कसे टिकविता येईल याकरिता डॉ संजय शेटये मार्गदर्शन करणार आहेत. डॉ संजय शेटये यांना “ठाणे गुणीजन” आणि “चिकित्सा रत्न” या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading