ठाणे कोविड हॉस्पिटल ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे आज कोजागिरीनिमित्त चंद्रोत्सवाचे आयोजन

ठाणे कोविड हॉस्पिटल ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे आज कोजागिरीनिमित्त चंद्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रतिथयश गायक आणि संगीतकार आपल्या गायन कलेने कोरोना पेशंटचे मनोरंजन करणार आहेत. यावेळी खास केशरदूध आणि अल्पोपहार याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम रात्री साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading