जिल्ह्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये,कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये जिल्हा न्यायाधीश-1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एन.के ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, १३८ एन. आय.अॅक्ट अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. सर्व पक्षकारांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीचे ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाशी २५४७६४४१ यावर संपर्क साधावा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading