जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ७७२ कोरोनाग्रस्त

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३७५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ७७२ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ४७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ४ हजार ६४७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख १६ हजार ८९५ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ४१६ रूग्ण उपचार घेत असून ४५ हजार ५३२ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार १६४ रूग्ण उपचार घेत असून ४८ हजार ९८८ बरे झाले तर १ हजार १९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार २४७ रूग्ण असून ४३ हजार ४८० बरे झाले तर ९२८ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ६४२ रूग्ण उपचार घेत असून २१ हजार ७७० कोरोनातून बरे झाले तर ७४१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३८२ रूग्ण असून ९ हजार ६७० बरे झाले तर ३४७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये २१६ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ४९९ कोरोनातून बरे झाले तर ३३७ जणं दगावले. अंबरनाथमध्ये २१८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार २४ बरे झाले तर २७७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २०१ रूग्ण असून ७ हजार २५० कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २८६ रूग्ण असून १५ हजार ४३३ बरे झाले तर ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading