जिल्ह्यात कोरोनाचे १ हजार ११३ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १ हजार ११३ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १९ हजार ७८६ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २५८ नवे रूग्ण आढळले. तर एकही मृत्यू नाही. सध्या ६ हजार ४९८ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार ११७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १३७ नवे रूग्ण तर ४ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार २४१ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९१८ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५०३ नवे रूग्ण ४ मृत्यू तर ५ हजार ७४७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ११ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ६९ नवे रूग्ण, १ मृत्यू, सध्या ८०३ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ४३ रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ६१२ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६५३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ६ रूग्ण, ० मृत्यू, सध्या १२७ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १८ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ३७३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५७२ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १६ रूग्ण, १ मृत्यू तर २७१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३८१ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये ६३ नवे रूग्ण मिळाले तर १ मृत्यू, सध्या १ हजार ११४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २४८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading