जिल्ह्यात कोरोनाचे १६९ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १६९ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही.
सध्या जिल्ह्यात २ हजार ३७ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९१५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ६७ रूग्ण आढळले. सध्या ७६५ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १३९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २० रूग्ण, सध्या २४७ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५६ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५५ नवे रूग्ण आढळले. सध्या ५५६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५२ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ८ रूग्ण तर सध्या १२२ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ७ रूग्ण तर सध्या ६४ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६५९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या २४ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २ रूग्ण तर २७ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १० रूग्ण, सध्या ११५ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading