जिल्ह्यात काल कोरोनाचे ७१० नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाचे ७१० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ५२२ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ५९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख १० हजार ८७७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख २२ हजार ९१२ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ५१० रूग्ण उपचार घेत असून ४७ हजार १०८ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २१२ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार २९२ रूग्ण उपचार घेत असून ५० हजार २०१ बरे झाले तर १ हजार ४० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ३४० रूग्ण असून ४४ हजार ६५९ बरे झाले तर ९५७ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ४७० रूग्ण उपचार घेत असून २२ हजार ४१६ कोरोनातून बरे झाले तर ७५२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३३६ रूग्ण असून ९ हजार ९३५ बरे झाले तर ३५० जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १२५ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ७०२ कोरोनातून बरे झाले तर ३४० जणं दगावले. अंबरनाथमध्ये १६६ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार २६० बरे झाले तर २८४ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १६१ रूग्ण असून ७ हजार ५४० कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार १२२ रूग्ण असून १६ हजार ५६ बरे झाले तर ५५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading