जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती

जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. कोरोना आजाराविषयी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर कलापथकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यातही लोककला आणि पथनाट्यांद्वारे शासनाने कोरोनाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनप्रबोधन करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सात तालुक्यातील 140 गावांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत आचारसंहिता लक्षात घेऊन निवडणूक नसलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 4 संस्थांना शासनाने प्राधिकृत केले असून या संस्थांमार्फत 40 कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. कलापथकांच्या माध्यमातून कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी, पाळावयाचे नियम याबाबत गाणी, नाटक, भारुड, पोवाडा, बतावणी, गवळण या माध्यमामातुन जनजागृती करणार आहेत. हे कलापथक जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन प्रबोधन करणार असल्याचे कोकण विभागीय माहिती उपसंचालक गणेश मुळे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading