जिल्ह्यात आत्तापर्यंत ५४ हजार १२१ रूग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ४७४ नवे रूग्ण सापडले. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ हजार ६४० कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत २ हजार १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५४ हजार १२१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ८० हजार ४१ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ५ हजार २७२ रूग्ण उपचार घेत असून १२ हजार ८७ कोरोना रूग्ण बरे झाले तर ५९९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ हजार ८८८ रूग्ण उपचार घेत असून १२ हजार ६२१ बरे झाले तर ३१६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ३९७ रूग्ण असून ९ हजार १४१ बरे झाले तर ३९४ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ७६६ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ६६० कोरोनातून बरे झाले तर २५६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये १ हजार ९७९ रूग्ण असून ४ हजार ४४३ बरे झाले तर ११६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ५३२ रूग्ण उपचार घेत असून २ हजार ७८३ कोरोनातून बरे झाले तर १९० जणं दगावले. अंबरनाथमध्ये ५६८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून २ हजार ८८० बरे झाले तर १४० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ६१४ रूग्ण असून १ हजार ७०५ कोरोनामुक्त झाले तर ४१ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार ६२४ रूग्ण असून २ हजार ८९२ बरे झाले तर १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading