जिल्ह्यात आज कोरोनाचे ७८९ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ७८९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७ हजार ९४६ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ६७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख १४ हजार ९६५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख २८ हजार ५८८ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ७९२ रूग्ण उपचार घेत असून ४८ हजार १९३ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २३१ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ७५७ रूग्ण उपचार घेत असून ५० हजार १४१ बरे झाले तर १ हजार ५९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ६५२ रूग्ण असून ४५ हजार ५४३ बरे झाले तर ९८२ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ६०९ रूग्ण उपचार घेत असून २२ हजार ७६७ कोरोनातून बरे झाले तर ७५६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २७८ रूग्ण असून १० हजार १९० बरे झाले तर ३५३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १२५ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ८०४ कोरोनातून बरे झाले तर ३४५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १८९ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ३८२ बरे झाले तर २८८ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २२३ रूग्ण असून ७ हजार ७२३ कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ३२१ रूग्ण असून १६ हजार २८३ बरे झाले तर ५६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading