जिल्ह्यात आज कोरोनाचे ७५८ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ७५८ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७ हजार ८३० कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख १४ हजार ३६१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख २७ हजार ७९९ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ८०० रूग्ण उपचार घेत असून ४८ हजार १२ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २२८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ७३७ रूग्ण उपचार घेत असून ५० हजार ९६६ बरे झाले तर १ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ६१३ रूग्ण असून ४५ हजार ३९८ बरे झाले तर ९७९ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ६१८ रूग्ण उपचार घेत असून २२ हजार ७११ कोरोनातून बरे झाले तर ७५६ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २६८ रूग्ण असून १० हजार १५८ बरे झाले तर ३५३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ११९ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ७९९ कोरोनातून बरे झाले तर ३४५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १७७ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ३७३ बरे झाले तर २८८ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २२४ रूग्ण असून ७ हजार ६८२ कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २७४ रूग्ण असून १६ हजार २६२ बरे झाले तर ५६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading