जिल्ह्यात आज कोरोनाचे ६१५ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ६१५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ४२४ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ५९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ११ हजार ५६५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख २३ हजार ५२७ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ४८३ रूग्ण उपचार घेत असून ४७ हजार २८१ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २१४ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ३०७ रूग्ण उपचार घेत असून ५० हजार ३३६ बरे झाले तर १ हजार ४२ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ३४१ रूग्ण असून ४४ हजार ७७६ बरे झाले तर ९५८ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ४३३ रूग्ण उपचार घेत असून २२ हजार ५१४ कोरोनातून बरे झाले तर ७५२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २६८ रूग्ण असून १० हजार १० बरे झाले तर ३५१ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १३४ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ७१० कोरोनातून बरे झाले तर ३४० जणं दगावले. अंबरनाथमध्ये १७१ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार २७५ बरे झाले तर २८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १६० रूग्ण असून ७ हजार ५६० कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार १२७ रूग्ण असून १६ हजार १०३ बरे झाले तर ५५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading