जिल्ह्यात आज कोरोनाचे ५ हजार ९५७ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ५ हजार ९५७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत २ लाख ९९ हजार १६५ रूग्ण कोरोनातून बरे झाले तर ६ हजार ५९९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४४ हजार २२३ रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण ३ लाख ४९ हजार ९८७ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १ हजार ८८३ नवे रूग्ण सापडले ४ मृत्यू तर सध्या १२ हजार ९८० रूग्ण उपचार घेत आहेत. ७२ हजार ८९२ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ४७५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १ हजार ३०९ नवे रूग्ण, ४ मृत्यू तर ११ हजार ३४९ रूग्ण उपचार घेत आहेत. ७४ हजार १८२ बरे झाले तर १ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १ हजार २१२ नवे रूग्ण ५ मृत्यू तर ९ हजार ६२० रूग्ण उपचार घेत आहेत. ६१ हजार ६३२ रूग्ण बरे झाले तर १ हजार १९८ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ४१४ नवे रूग्ण, १ मृत्यू तर ३ हजार १९६ रूग्ण उपचार घेत आहेत. २८ हजार ८१६ कोरोनातून बरे झाले तर ८४२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २६० नवे रूग्ण, १ मृत्यू तर २ हजार रूग्ण उपचार घेत आहेत. १२ हजार ६०८ बरे झाले तर ३८३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ७९ नवे रूग्ण, २ मृत्यू तर ८०२ रूग्ण उपचार घेत आहेत. ७ हजार ६० कोरोनातून बरे झाले तर ३६३ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ४४७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २ हजार २२० रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ९ हजार ६७८ बरे झाले तर ३२० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २३२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १ हजार १९६ रूग्ण उपचार घेत आहेत. १२ हजार ३३२ कोरोनामुक्त झाले तर १२५ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १२१ नवे रूग्ण, ३ मृत्यू तर ८६० रूग्ण उपचार घेत आहेत. २० हजार २५ बरे झाले तर ६१६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading