जिल्ह्यात आज कोरोनाचे ३ हजार ३८४ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३ हजार ३८४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ७ हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ८६३ नवे रूग्ण सापडले तर १३ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत १ हजार ६६० जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ८३५ नवे रूग्ण, १० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ४२१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५०१ नवे रूग्ण १२ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३५९ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ४४३ नवे रूग्ण, ९ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १३१ नवे रूग्ण, ३ मृत्यू तर आत्तापर्यंत ४२६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २६ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३८९ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १२५ नवे रूग्ण, ५ मृत्यू तर आत्तापर्यंत ३७६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १५२ नवे रूग्ण, २ मृत्यू तर आत्तापर्यंत १९० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ३०८ नवे रूग्ण सापडले तर १४ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ६८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading