जिल्ह्यात आज कोरोनाचे ३३३ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३३३ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार ८९२ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ९७४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३४ हजार ५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ४३ हजार ८७१ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९७८ रूग्ण उपचार घेत असून ५३ हजार ४२१ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३१० जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ९६८ रूग्ण उपचार घेत असून ५५ हजार ५७६ बरे झाले तर १ हजार १०६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ८८४ रूग्ण असून ४९ हजार २२७ बरे झाले तर १ हजार ५७ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ३४१ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार ३४५ कोरोनातून बरे झाले तर ७८३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये १९० रूग्ण असून १० हजार ६०३ बरे झाले तर ३६१ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ३१ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार २२८ कोरोनातून बरे झाले तर ३५२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ८९ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ८६८ बरे झाले तर ३०५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १५० रूग्ण असून ८ हजार ६३३ कोरोनामुक्त झाले तर ११९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २६१ रूग्ण असून १७ हजार ९४५ बरे झाले तर ५८१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading