जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार १६२ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार १६२ नवे रूग्ण सापडले. जिल्ह्यात सद्यस्थितीत १७ हजार ७१४ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत २ हजार ६४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७३ हजार ९२० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ९५ हजार ३९४ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ३ हजार ३७८ रूग्ण उपचार घेत असून १७ हजार ४४८ कोरोना रूग्ण बरे झाले तर ६८८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ४ हजार ६४६ रूग्ण उपचार घेत असून १६ हजार ७७९ बरे झाले तर ४२१ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ६८८ रूग्ण असून १३ हजार ५५२ बरे झाले तर ४५४ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ५३२ रूग्ण उपचार घेत असून ७ हजार ३८१ कोरोनातून बरे झाले तर ३०७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ७३२ रूग्ण असून ६ हजार १८७ बरे झाले तर १५० जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये २९४ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार २२५ कोरोनातून बरे झाले तर २१८ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ३८७ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ३ हजार ५६८ बरे झाले तर १६४ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ४१८ रूग्ण असून २ हजार ४७७ कोरोनामुक्त झाले तर ५१ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ८५५ रूग्ण असून ५ हजार २०४ बरे झाले तर १९० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading