जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ९३८ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ९३८ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १७ हजार ५०१ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ४ हजार ४५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ५३ हजार ५३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख ७५ हजार १२ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ३ हजार ६५९ रूग्ण उपचार घेत असून ३२ हजार ११७ कोरोना रूग्ण बरे झाले तर ९९५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार ८९८ रूग्ण उपचार घेत असून ३७ हजार ७०९ बरे झाले तर ८२६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ५९८ रूग्ण असून ३२ हजार ३२५ बरे झाले तर ७५० दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ९७१ रूग्ण उपचार घेत असून १५ हजार ८९० कोरोनातून बरे झाले तर ५६७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ६६६ रूग्ण असून ८ हजार २०७ बरे झाले तर २९९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये २८८ रूग्ण उपचार घेत असून ४ हजार ४२३ कोरोनातून बरे झाले तर ३०८ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ४०६ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ५ हजार ६२३ बरे झाले तर २३० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ४९८ रूग्ण असून ५ हजार ५५९ कोरोनामुक्त झाले तर ७७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार ५१७ रूग्ण असून ११ हजार २०० बरे झाले तर ४०६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading