जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ८० टक्क्यांहून अधिक मतदान

जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत 80.23 टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. जिल्ह्यात 143 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण 1 लाख 31 हजार 916 पुरुष मतदार तर 1 लाख 18 हजार 250 स्त्री मतदार आणि इतर – 2 असे एकूण 2 लाख 50 हजार 168 मतदार आहेत. एकूण 2 लाख 810 मतदारांनी मतदान केले. मतदान केलेल्या मतदारांमध्ये 94 हजार 602स्त्री मतदार, 1 लाख 6 हजार 208 पुरुष मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading