जव्हेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालयातर्फे कर्णबधीरांसाठी उद्या कान तपासणी शिबीराचं आयोजन

जव्हेरी ठाणावाला कर्णबधीर विद्यालयातर्फे कर्णबधीरांसाठी उद्या कान तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यातील वाडीया रूग्णालयात हे कान तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं असून दुपारी १ ते ४ या वेळात या शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. कर्णबधीरत्व हा दिव्यांगत्वाचा एक प्रकार आहे. भाषा कानावर न पडल्याने या मुलांना बोलता येत नाही आणि बोलता न आल्याने मुलांच्या शैक्षणिक, भाषिक, सामाजिक विकासात अडथळे निर्माण होतात आणि मुलांचे व्यक्तीमत्व खुंटते. कर्णबधीरत्वाचे शीघ्र निदान होणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading