छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी झाली. यंदा करोनाचे निर्बंध नसल्यामुळे दोन वर्षाच्या तुलनेत शिवजयंती साजरी करण्यामागे मोठा उत्साह दिसत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती वरून वाद आहे, शासकीय निर्णयानुसार शिवजयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते तर शिवभक्त तिथीनुसार शिवजयंती आज साजरी करतात. शिवजयंती मध्ये शिवसेनेचा सहभाग नसल्यामुळे फारसा उत्साह नसतो शासकीय आदेशानुसार 19 फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते पण त्यामध्ये फारसा उत्साह दिसत नाही. तिथीनुसार शिवजयंती जोरदार साजरी होते यामध्ये शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा मोठा सहभाग असल्यामुळे शिवजयंती साजरी होत असल्याचं दिसत.ठाणे महापालिकेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या हस्ते मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती.निमित्त ठाणे महापालिकेतर्फे संध्याकाळी उशीरा एक भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading