कोरोना निर्बंधांमुळे अंगारकी चतुर्थीलाही गणेश भक्तांना बंद दाराआडूनच घ्यावं लागलं श्रीगणेशाचं दर्शन

गेल्या काही अंगारकी चतुर्थीप्रमाणेच आजच्या अंगारकी चतुर्थीलाही कोरोना निर्बंधांमुळे गणेश भक्तांना श्रीगणेशाचं बंद दाराआडूनच दर्शन घ्यावं लागलं. कोरोना निर्बंधांमुळे सर्व मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. गणेश मंदिरंही बंद असल्यामुळं गणेश भक्तांना बंद दाराआडूनच दर्शन घ्यावं लागलं.
अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री गणेश भक्तांना टिटवाळ्याच्या महागणपतीचं दर्शनं मिळावं यासाठी रेल्वेतर्फे खास उपनगरीय गाड्याही सोडल्या जात असत. पण यंदा मात्र कोरोनामुळं असं काही झालं नाही. गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीगणेशाचं लांबूनच दर्शन घेण्यावर समाधान मानावं लागलं. आता २३ नोव्हेंबरला पुन्हा अंगारकी चतुर्थीचा योग आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading