कोरोनामुळे नवरात्रौत्सव साजरा करण्यात घट

यंदाच्या कोरोनानं सर्वच उत्सवांवर पाणी फिरवलं असून नवरात्रौत्सवातही कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. कोरोनामुळे नवरात्रौत्सव साजरा करण्यामध्येही जवळपास ३० टक्क्यांची घट झाली. महापालिकेच्या विसर्जन आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट दिसत आहे. गेल्यावर्षी २८१ घरगुती, १ हजार ७२८ सार्वजनिक, ८ हजार ३७३ घट असे एकूण ७ हजार ९०८ मूर्तींचं विसर्जन झालं. तर यंदा घरगुती उत्सव साजरा करण्याच्या प्रमाणात काहीशी वाढ झाली मात्र सार्वजनिक नवरात्रौत्सवात तर जवळपास ५० टक्के घट झाल्याचं दिसलं. यंदा ३१० घरगुती, ६३४ सार्वजनिक, ६ हजार ९५६ घट असे एकूण ७ हजार ९०८ मूर्तींचं विसर्जन झालं. म्हणजे साधारणपणे कोरोनाचा नवरात्रौत्सवावर ३० टक्के परिणाम झाला. कोरोनामुळे अनेक बंधनं या उत्सवावर असल्याचाच हा परिणाम होता असं दिसत आहे. आता दिवाळी तोंडावर आली असून दिवाळीतही हा परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading