कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाशिवरात्रीला कौपिनेश्वर मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. महाशिवरात्रीला शिवभक्तांची शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी होते. ठाण्यामध्ये कौपिनेश्वर मंदिर हे ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर असून या मंदिरातील शिवलिंग हे आकारानं देशातील मोठ्या शिवलिंगांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं सध्या सर्व सणांवर निर्बंध आले आहेत. अंगारकी चतुर्थीलाही गणेश मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. महाशिवरात्रीलाही सर्व लहान-मोठी शिवमंदिरं ही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. ठाणे नगर पोलीसांनी कौपिनेश्वर मंदिराच्या बाहेर नोटीस लावली असून आज सकाळी साडेवाजल्यापासून शुक्रवारी दुपारी साडेतीन पर्यंत मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्यात आल्याचं म्हटलं आहे.