कळव्याच्या काही भागात उद्या वीज नाही

कळव्याच्या काही भागात उद्या वीज पुरवठा बंद राहणार आहे.

टोरंट पॉवर कंपनीतर्फे कळवा येथील काही भागात शनिवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुरूस्ती आणि निगराणीचे काम हाती घेण्यात आल्याने तेथील वीज पुरवठा खंडीत राहणार आहे. कळवा पूर्व आणि पश्चिम येथील आतकोनेश्वर नगर, सफायर हॉस्पीटल, भास्कर नगर, पौंड पाडा, घोलाई नगर, आनंद विहार संकुल, अपर्णा राज सोसायटी, कोकणेश्वर पार्क, शिवशक्ती नगर, गुलमोहर, स्टॅन्डर्ड केमिकल, म्हात्रे कंपाऊंड, शिवशक्ती नगर आदी भागाचा वीज पुरवठा शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खंडीत राहणार आहे, असे टोरंट पॉवर कंपनीतर्फे कळवण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading