एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमधील त्रुटी दूर करून सुधारित नियमावली लागू करण्याची महापौरांची मागणी

एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमधील त्रुटी दूर करून सुधारित नियमावली लागू करावी अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. महापालिका क्षेत्रातील विकास नियोजन पध्दतीने व्हावा यासाठी महाराष्ट्रशासनाने एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली संबंधित महापालिका क्षेत्राची भौगोलिक परिस्थ‍िती लक्षात घेवून राबविणे सोईचे व्हावे यासाठी यातील काही त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे महापौर नमूद केले आहे. महापालिका क्षेत्रात ही नियमावली लागू होण्यापूर्वी दाखल केलेल्या अथवा मंजूर करण्यात आलेल्या मात्र अपूर्ण अवस्थेत असलेल्या बांधकाम प्रस्तावांना जुनी किंवा नवी नियमावली लागू करण्याबाबतचे धोरण निश्चित करणे, जुन्या ठाणे शहरातील पुनर्विकास प्रकल्पांकरिता आणि विशेषत: सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांकरिता वाढीव एफएसआय मंजूर करणे, पार्किंगच्या नियमात सूट देणे, इमारतीची उंची, मोकळ्या जागा, रस्तारुंदीकरण, अग्निशमन यंत्रणा याबाबतचे नियम अधिक सुस्पष्ट करणे, झोपडपट्टी पुनर्विकास प्रस्तावांबाबतच्या नियमांमध्ये सुसूत्रता आणणे याबाबत आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात आणि नवीन नियमावली सादर करावी अशी आग्रही मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading