उथळसर परिसराचा पाणी पुरवठा पूर्ववत

उथळसर परिसराचा पाणी पुरवठा आज सकाळपासून ठप्प झाला होता. उथळसर परिसराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे हा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. काल रात्री अडीचच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली होती. त्यामुळं या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाहून गेलं. ठाणे कारागृहाजवळील नाल्याच्या वर असलेल्या पूलाखाली ही जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनी फुटलेली जागा ही अतिशय अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळं तिची दुरूस्ती करण्याचं कामही अवघड होतं. मात्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-यांनी अतिशय अडचणीच्या जागेत फुटलेली ही जलवाहिनी दुपारच्या सुमारास दुरूस्त करून या भागाचा ठप्प झालेला पाणीपुरवठा सुरू करण्यात यश मिळवलं. त्यामुळं दुपारी १ वाजल्यापासून पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading