आपल्या मागण्यांसाठी परिवहन सेवेच्या कर्मचा-यांनी केलेल्या आंदोलनामुळे परिवहन सेवा विस्कळीत

ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केल्याने परिवहन सेवा विस्कळीत झाली. ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तीन वाजल्यापासून काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे परिवहन बस सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. परिवहन सेवेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणा-या कर्मचा-यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी संपही केला जाणार होता. पण आयुक्तांच्या विनंतीनंतर हा संप पुढे ढकलण्यात आला. पण त्यानंतरही कर्मचा-यांच्या मागण्यांची तड न लागल्याने हा बंद पुकारण्यात आला. कर्मचा-यांना ठोक पगार मिळावा अशी कर्मचा-यांची मागणी आहे. कर्मचा-यांना अवघे १० हजार रूपये वेतन मिळतं. मात्र तेही २-२ महिने मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचा-यांनी हा बंद पुकारला होता.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading