आजपासून शालिवाहन शके १९४१ विकारीनाम संवत्सराला प्रारंभ

आजपासून शालिवाहन शके १९४१ विकारीनाम संवत्सराला प्रारंभ झाला आहे. या नवीन संवत्सरामध्ये श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हे तीन महिने वगळता उरलेल्या ९ महिन्यात विवाहाचे मुहूर्त आहेत. नूतन संवत्सरामध्ये १७ सप्टेंबरला एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे तर सुवर्ण खरेदीदारांसाठी ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट असे ३ गुरूपुष्यामृत योग आहेत अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. २०२० ची दिनदर्शिका तयार झाली असून पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सुट्ट्यांची यादी दिली आहे. परंतु अधिकृत यादी शासनातर्फे वर्षाच्या अखेरीस जाहीर होत असते असंही सोमण यांनी स्पष्ट केलं आहे. पुढच्या वर्षी गुढीपाडवा बुधवार २५ मार्च २०२०, गणेश चतुर्थी शनिवारी २२ ऑगस्ट, दसरा रविवारी २५ ऑक्टोबर, दिवाळीतील लक्ष्मीपूजन १४ नोव्हेंबर, दिवाळी पाडवा १६ नोव्हेंबरला आला आहे. २०२० मध्ये अधिकमास आला असल्याचंही पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading