अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागानं बनावट हँड वॉश आणि सॅनिटायझरचा १३ लाखांचा साठा केला जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागानं बनावट हँड वॉश आणि सॅनिटायझरचा १३ लाखांचा साठा जप्त केला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनास दक्षता-गुप्तवार्ता विभागास डोंबिवलीत काही विक्रेत्यांकडे बनावट हँड सॅनिटीझर उपलब्ध असून त्यावर संशयास्पद उत्पादन परवाना क्रमांक असून उत्पादकाचे नाव आणि पत्ता नसल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी करून औषध निरीक्षकांनी शुगर सेंटर, सरस्वती कॉलनी, डोंबिवली, आर. आर. इस्टेट एजन्सी , राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली येथे धाड टाकून, त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेला आरुष हँड सॅनिटीझरचा सुमारे 6.80 लाख रुपयांचा साठा, खरेदी बिल आणि इतर कायदेशीर पुरावे सादर न केल्याने नमुने विश्लेषणास घेऊन जप्त केला. हा साठा या दुकानदारांनी जे. पी. पेंट अँड केमिकल, सुरत यांच्याकडून प्राप्त करून घेतला असल्याचे सांगितल्याने आणि नमूद उत्पादन परवाना क्रमांक अन्न आणि औषध नियंत्रण प्रशासन, गुजरात यांनी दिला नसल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले. हा साठा बनावट, विनापरवाना उत्पादन केला असल्याचा संशय बळावल्याने या उत्पादनाची माहिती तातडीने गुजरात राज्याच्या अन्न आणि औषध नियंत्रण प्रशासनास गोपनीयरीत्या कळविण्यात आली. या माहितीच्या आधारे अन्न आणि औषध नियंत्रण प्रशासन, सूरत, गुजरातच्या पथकाने जे. पी. पेन्ट अँड केमिकल्स, सुरत येथे धाड टाकून विनापरवाना उत्पादित हँड सॅनिटीझर, हँड वॉशचा सुमारे 13 लाखांचा साठा जप्त केला. या धाडी वेळी या उत्पादककडे उपलब्ध परवाना प्रत आणि इतर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. एखाद्या संशयास्पद औषधबाबतची माहिती आढळल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading