जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या समजल्या जाणा-या ७५व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाण्याचे जलतरण पटू चमकले आहेत. कलकत्ता येथे झालेल्या ८१ आणि १९ किलोमीटर अंतराच्या या जलतरण स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् क्लबचे ६ जलतरण पटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत शुभम पवार या जलतरण पटूनं ८१ किलोमीटर सागरी अंतर ११ तास ५८ मिनिटं २ सेकंदात पूर्ण केलं. तर राजेश पावशेनं हे अंतर १२ तासात पूर्ण केलं. १९ किलोमीटरच्या स्पर्धेत पृथ्वीराज कांबळे, यश सोनक, सानिका तापकीर, मंजिरी मोरे यांनी हे अंतर यशस्वीपणे पूर्ण केलं. या सर्वांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला.
