२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार राजन विचारे यांनी श्रध्दांजली वाहण्यासाठी शहीद उद्यानात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुंब्र्यामध्येही असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. खासदार राजन विचारे यांच्यातर्फे सिध्देश्वर तलाव येथील शहीद उद्यानात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्राणपणानं लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या वीर जवानांचं स्मरण व्हावं म्हणून बांधण्यात आलेल्या शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना देण्यात आली. वागळे इस्टेटमध्ये साठेनगरात नवनाथ मित्रमंडळ, श्रीसाई गोविंदा पथकातर्फे शहीदांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: