हुक्का पार्लर आणि अनधिकृत फलक आणि होर्डींगवर कडक कारवाईचे आदेश

शहरातील हुक्का पार्लर आणि अनधिकृत फलक आणि होर्डींगवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका मुख्यालयात अधिका-यांच्या बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. राज्य शासनानं हुक्का पार्लर संदर्भात केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. शहरातील अनधिकृत फलक आणि होर्डींग्जवर कडक कारवाई करण्याबरोबरच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीअंतर्गत अनधिकृत फलक आणि होर्डींग्जवर कारवाई करावी असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: