हात बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडलेल्या ४ वर्षीय चिमुकलीची रवानगी बालसंगोपन केंद्रात

ठाण्यामध्ये हात बांधून ठेवलेल्या अवस्थेत सापडलेल्या ४ वर्षीय चिमुकलीची रवानगी बालसंगोपन केंद्रात करण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वी गोखले रस्त्यावरील गावदेवी मंदिरासमोर रात्रीच्या सुमारास एका महिलेनं दोन्ही हात ओढणीनं बांधलेल्या अवस्थेत एका चार वर्षीय मुलीस सोडून दिलं होतं. या चिमुकल्या मुलीच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर जखम होती. नौपाडा पोलीसांनी या मुलीला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. जिल्हा रूग्णालयातील लिला गवारगुरू या मावशीने आठवडाभर तिचे संगोपन केलं. तिची प्रकृती स्थिर झाल्यावर पोलीसांनी तिची आस्थेनं विचारपूस केली असता आईने आणि पप्पाने मारले असे तिने हिंदी भाषेत सांगितले. स्वत:चे नावही ती नीट सांगू शकत नाही. तरीही त्रोटक माहितीच्या आधारे नौपाडा पोलीस या मुलीच्या माता-पित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुलीला सोडून ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जातानाचा हा प्रकार क्लोज सर्कीट कॅमे-यात कैद झाला असून पोलीस यावरून मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुलीची प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर तिची रवानगी भिवंडीच्या बाल संगोपन केंद्रात करण्यात आली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading