स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरिता उभारण्यात आलेल्या स्टॉलला पालकमंत्र्यांनी भेट देऊन स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं. रेमंड येथील मैदानात ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून वृक्षवल्ली प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या मोहिमेची जनजागृती करण्याकरिता महापालिकेतर्फे स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलला भेट देणा-या नागरिकांना स्वच्छता मोहिमेची माहिती देण्याबरोबरच कचरा वर्गीकरण आणि सेंद्रीय खत निर्मिती कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक दिलं जातं. या स्टॉलला भेट देऊन स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या मोहिमेची माहिती घ्यावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
