स्टुडंट ऑफ द इअरचा शानदार सांगता सोहळा

मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार डोळयांसमोर ठेऊन ठाण्यातील क्रिएटीव्हफाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या स्पर्धेचा सांगता सोहळा काल संपन्न झाला. या स्पर्धेत ठाण्यातील जवळजवळ ७५ शाळांमधील मुले सहभागी झाली होती. या स्पर्धेअंतर्गत विविध प्रकारच्या दहा चाचण्या मुलांना पार कराव्या लागतात. सहा महीने चालणा-या या उपक्रमाचा सांगता समारंभही अतिशय सुंदर पद्धतीने साजरा झाला. भारतीय ऑलीम्पिकपटू आणि आशियाई स्पर्धेचे विजेते नौकानयनपटू दत्तू भोकनाळ यांची या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.भोकनाळ यांनी मुलांना अतिशय सोप्या शब्दात सर्वांगीण विकासाचे महत्व समजावून सांगितले. त्यांच्याबरोबरच ठाण्यातील ‘मिराजइनस्ट्रुमेंटेशन’ या कंपनीचे संचालक राजेश सोळंकी हेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहूंणे म्हणून उपस्थित होते. पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बॅकेचे संचालक जॉय थॉमस यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध बिल्डर अजय आशर यांच्या प्रेरणादायी शब्दांनी मुले भारावून गेली. यावेळी तीन मुलांना ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ म्हणून गौरवण्यात आले. नालंदा पब्लिक स्कुलचा आहान वैद्य, सिंघानिया स्कुलची बेनिशा ठक्कर आणि सरस्वाती सेकंडरी स्कुलचा राज जाधव यांची २०१८ चे स्टुडंट ऑफ द ईअरम्हणून निवड झाली. एक टॅब, रोख रक्कम, अशी अनेक बक्षीसे विजेत्यांना देण्यात आली. टॉप १०० मध्ये निवड झालेल्या मुलांनी सादर के लेल्या विविध गुणदर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. गायन, वादन, नृत्य आणि नाट्य अशा अनेक अंगानी बहरलेल्या या कार्यक्रमात मुलांचा उत्साह अगदी ओसंडून वहात होता.

Leave a Comment

%d bloggers like this: