सिनियर नॅशनल ज्युदो चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलला रौप्य पदक

सिनियर नॅशनल ज्युदो चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटील हिला रौप्य पदक मिळालं आहे. या स्पर्धेत देशभरातून अडीचशे स्पर्धक सहभागी झाले होते. ३ ते ७ जानेवारी दरम्यान विशाखापट्टणम् येथील सुवर्णभारती इनडोअर स्टेडीयममध्ये झालेल्या ७८ किलोग्रॅम वजनी गटात अपूर्वा पाटील हिनं ओरिसा, कर्नाटक, पंजाब आणि ऑल इंडिया पोलीसांच्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून अंतिम फेरी गाठली. सेंट्रल रेल्वे पोलीस फोर्समधील उमा चौहान बरोबर झालेल्या लढतीत कमी गुणांमुळे हार पत्करावी लागली आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अपूर्वा पाटील ही १६ वर्षाची असून सिनियर ज्युदो स्पर्धेत प्रथमच खेळली आहे. तब्बल १२ वर्षानंतर महाराष्ट्राला अपूर्वाच्या मेहनतीमुळं रौप्य पदक मिळालं आहे. अपूर्वा पाटील ही सरस्वती क्रीडा संकुलात देवीसिंग रजपूत यांच्याकडे प्रशिक्षण घेते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading