सिगारेट दिली नाही म्हणून ७ जणांच्या एका टोळक्यानं मजुराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार

सिगारेट दिली नाही म्हणून ७ जणांच्या एका टोळक्यानं मजुराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या मजुराचं नाव राजेश पाल असून मारहाणीला घाबरून त्याने इमारतीच्या थेट तिस-या मजल्यावरून उडी मारल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. राजेश पाल हा प्लास्टर आणि स्टील फ्रेम बनवण्याचं काम करतो. नेहमीप्रमाणे गुरूवारी मध्यरात्री केवळ सिगारेट दिली नाही या रागातून सद्दाम नईम, महम्मद आलम, मंजूर आलम, मनबीर आलम, सोफीयान बशिरूद्दिन, आफताब आलम आणि एहतेशाम आलम या सात जणांनी राजेशला शिवीगाळ करत लाठ्याकाठ्या आणि लोखंडी गज द्वारे जबर मारहाण केली. यामुळं घाबरून गेलेल्या राजेशनं थेट तिस-या मजल्यावरून उडी मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी बलराम कुमार यादव यांच्या तक्रारीवरून या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading