सार्वजनिक बांधकाम विभागाची खड्ड्याच्या तक्रारी करण्यासाठी नवीन प्रणाली

सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी एक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य महामार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा पीडब्ल्यूडी डॉट कॉम या संकेतस्थळावर ही तक्रार प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यांची माहिती, फोटो या संकेतस्थळावर अपलोड करावेत म्हणजे खड्डयांची दुरूस्ती करता येईल असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या तसंच देखभाल दुरूस्ती करण्यात येणा-या राज्य महामार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आढळल्यास त्याची तक्रार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर ग्रिव्हीयन्स पोर्टल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्याचे नाव, जिल्हा, खड्ड्यासंदर्भातील तक्रारीचा तपशील, शक्य असल्यास फोटो तसंच तक्रारकर्त्यांनी आपलं नाव, पत्ता, ई-मेल अशी माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं कळवलं आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: