सरस्वती मंदिर ट्रस्टच्या एक धाव शाळेसाठी उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या एक धाव शाळेसाठी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या नूतन इमारतीकरिता निधी जमवण्यासाठी एक धाव शाळेसाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ६०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. नौपाडा परिसरातील ज्येष्ठ व्यक्ती, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी यांचा मोठा सहभाग होता. एक धाव शाळेसाठी या उपक्रमाच्या नोंदणीतून ६ लाख तर देणगीतून ३५ लाखांचा निधी नूतन इमारतीसाठी जमा झाला. संस्था मराठी विभागाच्या शाळेसाठी १५ कोटींची ६ मजली इमारत उभारत आहे. ही संपूर्ण इमारत फक्त शैक्षणिक उपक्रमासाठीच वापरली जाणार आहे. या विद्या संकुलात मराठी पूर्व प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. नवीन इमारत बांधणीसाठी लागणा-या निधीकरिता संस्थेनं निधी उभारण्याची मोहिम हाती घेतली आहे. आता २३ डिसेंबरला संध्याकाळी ५ ते साडेसात या वेळेत एक सूर एक ताल शाळेसाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेचे माजी विद्यार्थी सादर करणार आहेत. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या कलाकृतीवर आधारीत सेतू बांधा रे या कार्यक्रमात संगीत नृत्य आणि अभिवचन यांची सुरेल मैफील रंगणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: