समूह विकास योजनेला गती मिळावी यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

ठाण्यातील समूह विकास योजनेला गती मिळावी यासाठी महापालिका आयुक्तांनी या योजनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी समूह विकास योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याकरिता कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पुढील महिन्यात होणा-या सर्वसाधारण सभेसमोर ४ नागरी समूह आराखडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नागरी समूह विकास योजनेमध्ये करावयाच्या विविध पायाभूत सोयीसुविधांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात येणा-या गृहसंकुलातील सदनिका लीज ऐवजी मालकी हक्कानं देण्याबाबत शासनाकडे निर्देश मागवण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: