शिवसेनेतर्फे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित रक्तदान शिबीरात ठाण्यातून २६७ रक्तदात्यांचे रक्तदान

नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान उपक्रमांतर्गत ११३७ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. शिवसेनेतर्फे शहापूर, नाशिक, नगर, धुळे, पनवेल, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि मिरज येथे गेली २४ वर्ष ३१ डिसेंबरला रक्तदानाचा उपक्रम आयोजित केला जातो. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला धिंगाणा घालण्यापेक्षा रक्तदान करून नवीन वर्षाची सुरूवात करण्याचा स्तुत्य पायंडा शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी २४ वर्षापूर्वी पाडला होता. यंदाही नववर्षाचे स्वागत अशा रक्तदान शिबीरानं करण्यात आलं. ठाण्यात झालेल्या रक्तदान शिबीरात २६७ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. यावेळी पालघरमधील ५२ वेळा रक्तदाना करणा-या वैशाली चव्हाण, ४८ वेळा रक्तदान करणारे दत्ताराम गवस, २८ वेळा रक्तदान करणारे गणेश तरे आणि २५ वेळा रक्तदान करणा-या प्रभाकर भेरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्कारानं गौरव करण्यात आला.

Leave a Comment

%d bloggers like this: